HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांचा ‘हा’विश्वासू नेता लवकरचं शिवसेनेत..

बार्शी- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे लवकरचं शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे .राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज बार्शीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यकर्ता मेळाव्याच्या पोस्टरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे दिलीप सोपल शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे .

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस – राष्ट्रवादीमधील अनेक आमदार आणि नेत्यांनी भाजप- शिवसेनेचा रास्ता धरला.त्यातच बार्शी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे, खुद्द सोपल यांच्याकडून चर्चेला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीप सोपल प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होत. असाच काहीसा प्रकार साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबतीतही घडला, खुद्द शरद पवार यांनी ते राष्ट्रवादीच्याच आहेत असे म्हटले होते मात्र २ दिवसात शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला .

आ. सोपल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जाते, परंतु मागे सुद्धा अशाच काही विश्वासू नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. आता दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तोसुद्धा राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल .

Related posts

#LokSabhaElections2019 : ‘मै भी चौकीदार’ व्हिडिओवर काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk

सरकारी कार्यालयात मराठी सक्तीची  

News Desk

दारूच्या दुकानाविरोधात नगरसेवकांनी केला अंगावर राकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk