HW News Marathi
राजकारण

शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राहुल गांधींची भेट, लवकरच करणार काँग्रेस प्रवेश

नवी दिल्ली | अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे त्यांना भाजपचे तिकीट कापण्यात आले आहे. यानंतर सिन्हा यांनी आज (२८ मार्च) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे बिहारमधील प्रमुख नेते शक्ती सिंग गोहील यांनी सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सिन्हा हे काँग्रेसचे स्टार प्रचारक देखील असणार असल्याची माहिती दिली आहे.

शत्रुघ्न सिन्हा हे भाजप कडून पाटना साहीब मतदारसंघातून निवडणूक लढवायचे. परंतु यंदा या मतदारसंघातून पक्षाने केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांना तिकीट देऊन शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसचा वाटेवर गेले आहे. परंतु अद्याप बिहारमधील महागठबंधनचे जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसने अद्याप पाटना साहिबमधून सिन्हा यांना तिकीट देणार की नाही हे जाहीर केलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk

हा तर आमचा नैतिक विजय | ममता बॅनर्जी

News Desk

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, ‘इंदूर’चा निर्णय पक्ष घेईल !

News Desk