Site icon HW News Marathi

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ‘या’ प्रकरणात मिळाला दिलासा

मुंबई | शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला. पोलिसांना सरनाईकांवर सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाही, असे पोलिसांनी म्हटले. यानंतर पोलिसांच्या सी समरी रिपोर्ट ईडीच्या (ED) कारवाईविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून सरनाईकांची चौकशी देखील केली होती. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सरनाईकांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यामुळे त्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जाते. ईडीच्या अटकेत असलेले अमित चांदोले हे सरनाईकांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे ईओडब्ल्यूने सादर केलेल्या सी समरी रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळेच ईडीने दाखल केलेल्या प्रकरणाचा अर्थ उरत नाही, असा दावा सरनाईकांने याचिकेत केला आहे. या प्रकरणी ईडी 21 सप्टेंबरला मुंबई सत्र न्यायालया आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. तोपर्यंत चांदोले आणि शशिधरन कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

काय आहे प्रकरण

2014 साली एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला दिले होते. परंतु, या सुरक्षा रक्षक कंत्राटसंदर्भात गैरप्रकार झाला. याचा आर्थिक फायदा सरनाईक चांदोलो यांनी घेतल्याची तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने केली होती. या प्रकरणाचा ठपका ठेऊन मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी ईडीने सरनाईकांच्या घरावर छापा टाकून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे.

 

 

Exit mobile version