HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची जीभ घसरली. “दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते ‘मेरा बाप चोर है’. तस यांचे नातेवाईक, यांची पोरे, यांच्या बायका उद्या लोक म्हणतील”, अशी टीका राऊतांनी केली. राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे.राऊतांनी नाशिकमध्ये आज (2 डिसेंबर) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेतून भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

राऊतांनी केलेल्या टीकेवर गायकवाड प्रत्युत्तर देताना माध्यमांशी बोलताना त्यांची जीभ घसरली. गायकवाडांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दाराचा आरोप नाही लागणार आहे. आमच्यावर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना लागणार आहे. त्यामुळे **** संजय राऊत तू यानंतर अशी भाषा वापरू नको. आम्ही पडायचे की लढायचे, तर जनतेला आमचा निर्णय मान्य आहे. तुम्ही जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. ती जनतेला मान्य नाही. आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी निवडून दिले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना म्हणून नाही. त्यामुळे अमिताभ बच्चनचा डायलॉग मारून तो पिचर पुरता ठिक आहे.  प्रॅक्टिकल जिवनात तू जेव्हा पाहशील आम्ही दाखवू आमच्या किती जागा महाराष्ट्रात येतात”, असे म्हणाले.

संजय राऊत नेमके काय म्हणाले

राऊत म्हणाले, “मी गद्दार किंवा खोकेवाले आमदार यांच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे. जसे ‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. राऊत पुढ म्हणाले, “‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते ‘मेरा बाप चोर है’. तस यांचे नातेवाईक, यांची पोरे, यांच्या बायका उद्या लोक म्हणतील. हे गद्दार आहे. यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यानपिढ्यांना ही गद्दारी आता त्यांना शांतपणे जगू देणार नाही.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तेव्हा कळेल, वारसाला मिळते की कर्तृत्वाला”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून संवाद दौरा सुरू

News Desk

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

News Desk