Site icon HW News Marathi

शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रीपद? या नावाची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करून राज्यात सत्तांतर घडवून आणल. शिंदे गटात 50 आमदार आहेत त्यामुळे शिंदेंची बाजू देखिल मजबूत आहेत. विशेष म्हणजे आमदारांच्या पाठोपाठ शिंदेंना खासदारांनी देखिल जाहीर पाठिंबा दर्शवला लोकसभेचे १२ खासदार शिंदेसोबत आहेत म्हणून शिंदेंची बाजू आता लोकसभेत देखिल जड झाली आहे.

शिंदे समर्थक १२ खासदार

१) भावना गवळी
२) राहुल शेवाळे
३) हेमंत गोडसे
४) धैर्यशील माने
५) संजय मांडलिक
६) राजेंद्र गावित
७) श्रीरंग बारणे
८) श्रीकांत शिंदे
९) सदाशिव लोखंडे
१०) प्रताप जाधव
११) कृपाल तुमाणे
१२) हेमंत पाटील

स्थापन केल्यानंतर मंत्री मंडळात आतापर्यंत शिंदे गटाच्या ९ आमदारांना मंत्री पद मिळालं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात देखिल आणखी आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गताशिवय राज्यात सत्ता स्थापन कारण भाजपला शक्य नव्हत म्हणून शिंदे गटातले आमदार नाराज होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

राज्यात सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर शिंदे गटाला केंद्रांत देखिल मंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचा साथ सोडल्यानंतर शिंदे गट सध्या NDA चा सगळ्यात मोठं गट आहे म्हणून शिंदे गटाला केंद्रांत मंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रात विस्तार होऊन शिंदे गटाला सामावले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. एका कॅबिनेट सोबत अजून एक राज्यमंत्रीपद देखील मिळणार का याची उत्सुकता लागून आहे.

राज्यात मंत्री मंडळाचा पहिल्या टप्प्याचा विस्तार पार पडला आहे मंत्र अद्याप खातेवाटप झालेलं नाही. शिंदे – फडणविस सरकारमधील सर्व मंत्री सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत. मंत्री पदासाठी शिंदे गटात नाराजी पाहायला मिळाली मात्र खाते वाटपावरून देखिल नाराजी पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version