Site icon HW News Marathi

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेत केला अर्ज दाखल

मुंबई | शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी (dasara melava) मुंबई महानगरपालिकेत अर्ज दाखल केला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी पालिकेत अर्ज दाखल केले आहे. या अर्जातून शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याची मागणी केली आहे. याआधी शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची मागणी करणारा अर्ज केला होता. परंतु, यावर अद्याप निर्णय घेतला नाही. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे, म्हणून अर्ज केला आहे. यामुळे पालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी नक्की कोणाला परवानगी मिळेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सरवणकरांनी शिवाजी पार्कामध्ये दसरा मेळाव्याची परवानगी मिळवण्यासाठी जी नार्थ वॉर्डकडे अर्ज केला आहे. तसेच यंदाचा दसरा हा 5 ऑक्टोबरला आहे. तर या निमित्ताने शिवसेना दसरा मेळावा घेते. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत बंडखोरी करत राज्यात भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासूनच पक्षावर दावा केला आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याचे विशेष असे महत्व आहे. या मेळाव्यात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषण करत शिवसैनिकांनी संबोधित करतात. या भाषणातून पक्षांची पुढची दिशा आणि राजकीय घडामोडींवर भाषण करतात.

 

मुख्यमंत्री दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करणार

 

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ‘एबीपी माझा’वर दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी शिवसेनेचा आमदार आहे. गेली 15 वर्षासाठी मी दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतोय. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी अर्ज केलेला आहे. दसरा मेळाव्यासाठी तुम्हाला परवानगी मिळाली तर प्रमुख मार्गदर्शन कुणाचे असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सरवणकर म्हणाले, “एकनाथ शिंदेसाहेबांचे असेल.” यावर मग, उद्धव ठाकरे यांच्याकडून जो अर्ज केलेला आहे. त्या अर्जाला जर परवानगी मिळाली नाही, तुम्ही केलेला अर्ज ग्राह्य धरला जाईल का? असा प्रश्न पत्रकारांनी सरवणकरांना विचारला, “मी शिवसेना म्हणून अर्ज केलेला आहे. या मेळाव्याचे मार्गदर्शन शिंदेसाहेब करणार आहेत. आणि इतर कोणत्या गटाने मेळाव्यासाठी अर्ज केला आहे हे मला माहिती नाही.

Exit mobile version