Site icon HW News Marathi

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

मुंबई | नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Sanjay Bangar) यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. संतोष बांगर यांनी ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु, संजय बांगर यांनी त्यांच्या होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणी संतोष बांगरांनी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, “माझी कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुजत घातलेली नाही. मी माझ्या काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात गेल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रजिस्टारमध्ये एन्ट्री करण्यास सांगितले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने आमच्यासोबत आमदार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मला ओळखले नाही. मग, पोलीस कर्मचाऱ्यांना मझी ओळख पडल्यानंतर सन्मान आत पाठवले. यानंतर माझ्या पीएने रजिस्टारमध्ये एन्ट्री केली. पण, आम्ही कोणाशीही हुज्जत घातली नाही. जर हुज्जत घातली असती तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासावा,” असा दावा केला.

नेमके काय आहे

माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी ही आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयात जात असताना प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वांना थांबून पासची विचारणा केली. परंतु, पास विचारपूस केल्याने आमदार बांगर आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. यानंतर बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि तुम्ही आपल्याला ओळखत नाही का?, असे विचारले. यासंदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु, बांगरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version