HW News Marathi
राजकारण

शिवसेना – भाजप युती तुटणार ही केवळ अफवा ?

मुंबई | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दादरच्या शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भाजप सेना युती तुटणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु यामध्ये काहीच तथ्य नसल्याची माहिती शिवसेनेतील खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

पालघर निवडणुकीमुळे शिवसेना भाजपमधील दरी वाढली आहे. परंतु आजची पत्रकार परिषद केवळ पालघर निवडणुकी संदर्भात बोलण्यासाठी असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली असून युती तुटणार असल्याची केवळ अफवा असल्याची माहिती समोर येत आहे. आता उद्धव ठाकरे सेना भाजप युती तोडणार का ? हे काहीच वेळात स्पष्ट होणार आहे. थोड्याच वेळात सेना भवन येथे पत्रकार परिषदेला सुरुवात होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी पंढरपूरची वारी !

News Desk

युतीच्या सत्तास्थापनेबाबतचा निर्णय भाजपने लिखित स्वरूपात द्यावा !

News Desk

“रोशनी शिंदेंला मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा”, जयंत पाटलांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Aprna