Site icon HW News Marathi

“सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे,” उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

मुंबई | “ही सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे. ती झडताय पाने ती झडलीच पाहिजे. आता सडलेली पाने झडताय,” असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोरांना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत ‘सामना’चे (saamana )कार्यकारी संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज (26 जुलै) सकाळी 8.30 वाजता प्रसारित करण्यात आला आहे. आणि या मुलाखती उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या (27 जुलै ) प्रसारित होणार आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या पाला पाचोळा उडतोय. कोण कुठे हा इकडने तिकडे जातोय, पाला पाचोळा तिकडे जातोय आणि परत इकडे हा पाला पाचोळा येतोय. जी पाने गळने गरजेची होती, ती उडतात. मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटले होते. ज्या वेळेला मी वर्षामध्ये राहत होतो. वर्षामध्ये दोन झाडे ही घराला लागून आहेत. एक गुलमोहर आणि दुसरे बदामाचे दोन्ही झाडे मी दोन एक वर्ष झाले पाहात आहे. त्याला आपण पतझ म्हणतो की पानेपुर्ण कळून पडतात. त्याला आपण पानगळ म्हणतो, पाने पूर्ण गळून पडतात फक्त काड्या राहतात, आपल्याला वाटते की या झाला काय झाले. पण दोन-तीन दिवसात पुन्हा झाडांना कोम येतात. अंकुर येतात. आणि मी पाहिले की 8-10 दिवसात ते बदामाचे झाड आणि गुलमोहर सुद्धा हिरवे गार झाला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “म्हणून ही सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे. ती झडताय पाने ती झडलीच पाहिजे. आता सडलेली पाने झडताय. ज्यांना त्या झाडाकडून सगळे काही मिळले. सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीत पणा होता. ती पाने सगळे झाडाकडून घेऊन ती गळून पडत आहेत. बघा उघडंबोडपे झालेय असे दाखवायचा ते प्रयत्न करता आहेत. पण दुसऱ्या दिवशी आपला माळीबुआ येतो, ती सगळी पानगळ केराच्या टोपलीत घेतो. आणि घेऊन जातो. ती सर्व पान झडण्याचा वेळ सुरू आहे, असे राऊतांनी विचारल्यावर ते उद्धव ठाकरे म्हणाले, आता नवीन कोम फुटायला लागेत. शिवसेना आणि तरुण युवा हे नाते शिवसेनेच्या जन्मापासून आहे. मात्र एक आहे. अजूनही काही जेष्ठ शिवसैनिक ते येऊन येऊन भेटत आहेत. ज्यांना बाळासाहेबांसोबत काम केलेले आहे.”

शिवसेना आपल्या काही कपाळ करंट्या लोकांच्या मोडावी, असा एक प्रयत्न केला जातोय

गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रात देशात एक राजकीय वादळाचा भास निर्माण केला जात आहे, असा सवाल संजय राऊत यांनी प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ” वादळ आल्याचा भास होतोय, वादळ म्हटले की, पाला पाचोळा उडतो. तो पाला पाचोळा सध्या उडतोय. तो पाला पाचोला एकदा बसला. हे खरे दृष्य लोकांसमोर लवकरच येणार आहे. मी शांत कसा, तर मला चिंता नाही, चिंता माझी नाही, शिवसेनेची बलकुल नाही. थोडी फार जी आहे ती नक्कीच मराठी माणसाची आणि हिंदु आणि हिंदुत्वाची आहेच. याचे कारण हिंदु द्वैष्टीक हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसाची एकजूट सुटावी आणि फुटावी. हिंदुमध्ये फूट पडावी. जी मेहनत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मराठी माणस आणि हिंदुत्वाची एकजुट करण्यासाठी ती आपल्या काही कपाळ करंट्या  लोकांच्या होडावी आणि मोडावी. असा एक प्रयत्न केला जातोय.”

 

 

Exit mobile version