Site icon HW News Marathi

…माझा न्यायदेवतेवर विश्वास! – उद्धव ठाकरे

मुंबई | “कोर्टात उद्या काय होईल ते होईल. माझा न्यायदेवतेवर विश्वार आहे”, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  केली आहे. उद्धव ठाकरेंना सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी  आज (21 ऑगस्ट) मातोश्रीवर भेट घेतली. त्यावेळी सांगलीतील शिवसैनिकांनी पाच बॉक्सभरून सदस्य नोंदणी आणि प्रतिज्ञापत्रे दिली. यावेळी शिवसैनिकांनी संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिंदे सरकारकडे सगळेच पैशांनी काम होते. सदस्य नोंदवायला सुद्धा येच आहे आणि इतकडे पण तेच… माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्याकडे रक्ता मासाची हाडा मासाची जिंवाला जिव देणारी माणसे आहेत. आता तुम्ही जी सदस्य पत्र घेऊन आलेले आहात. आज आलेली सदस्य नोंदणीचा हा पहिला टप्पा असल्याचे मी मानतो. या निमित्ताने कोर्टात उद्या काय होईल ते होईल. माझा न्यायदेवतेवर विश्वार आहे. पण, जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. ते लोक आज निवडणुकीची वाट बघत आहेत. निवडणुका कधी एकदा येतात, आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवितोय. निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत मला दिसत नाही. मग निदान या सगळ्या जनतेच्या भावना आहेत. या रुपाने तरी का होई ना. आपल्यासोबत जोडल्या गेल्या पाहिजेत.”

शिंदेंनी पक्षासोबत बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर ठाकरेंनी शिंदे गटाविरोधा सर्वोच्च न्यायालयात पाच याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (22 ऑगस्ट)  सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत हे प्रकरण घटनापीठाकडे करण्याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी शिंदे गट आणि शिवसेनेवर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

“…आम्ही कधी ‘या’ गद्दारांना धडा शिकवतो”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Exit mobile version