Site icon HW News Marathi

‘हम तुम एक कमरे में बंद’, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई | ‘हम तुम एक कमरे में बंद’, असेच आहे ना सरकार, ‘और चाबी खो जाए’, असे म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज (27 जुलै) सकाळी 8.30 वाजता प्रसारित झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सामनाची (Saamana) मुलाखतीत एकनाथ शिंदे,  भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा, बहुमत चाचणी, पालिका निवडणुकीत भगवा फडकणार, आदी मुद्यांवर मत मांडले.

अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राज्याचा सरकार सांभाळले, आजच्या नव्या सरकारकडे तुम्ही कसे पाहाता?, राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंना म्हणाले, “सरकार स्थापन झाल्यावर त्यावर बोलत काही तरी अर्थ आहे. यावर राऊत पुढे म्हटले की, “अजून सरकार स्थापन झाले नाही.” त्यावर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हम तुम एक कमरे में बंद हो, असेच सरकार आहे ना. ‘और चाबी खो जाए’ आणि वरून चाबीने जेव्हा उघडतील, म्हणजेच दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्तारावर होकार आल्यावर सरकार स्थापन होणार आहे, असा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला. यामुद्द्याला धरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “या पूर्वी देवा नंदचा सिनेमा होता, ‘हम दोनों, दोन्ही वरून बरेच काही ते खूप काही काही उदाहरण आहे.”

शिंदे सरकारने निर्णयाला स्थगिती देण्याची जी घाई केली. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत आरे कारशेडवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला. आरे कारशेडवरून उद्धव ठाकरे म्हणाले, “काही काही निर्णय जसे आरे कारशेड माझे पुन्हा पुन्हा एकच म्हणणे आहे. माझ्यावरचा राग तुम्ही मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाचा घात होईल,असे काही करू नका. तिथे झाडांची कत्तल केल्यानंतर सुद्धा बिबट्यांचा वावर आहे. आजही आरेमध्ये वन्य जीवाचे अस्तित्व आहे, असा रिपोर्ट माझ्याकडे आहे. शिंदे सरकारने आरे येथील कारशेड सोडून जिथे ओसाड जागा आहे. म्हणजे कांजूरची जागा ओसाड आहे. त्या जागी जर मेट्रोचे कारशेड करावे. तर या मेट्रो अधिक लोकांसाठी वापरता येईल. आज ना उद्या कांजूरच्या जागेवर हात घालावा लागेल. आता सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, आरे येथे कारशेड करताना एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले की, ऐवढी जागा वापरणार नाही. ती जागा देखील वापरावीच लागणार आहे. तेथे झाडी आहेत. केवळ तुमच्या हट्टापायी, कृपा करा, मुंबईचा घात करू नका.”

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईचे नाहीत, म्हणून त्यांना मुंबईबद्दल प्रेम नाही

उद्धव ठाकरे आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मुंबईची टीका केली. याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, “मग मला असे बोलावे लागेल की, हे मुंबईचे नसल्यामुळे त्यांना मुंबईबद्दल प्रेम नाही. महाराष्ट्र आपले आहे, मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई, ठाणे, नागपूरचा नसतो. मी मुख्यमंत्री असताना मला एका गोष्टीचे समाधान आहे. जिथे जिथे शक्य आहे. तिथे तिथे वन ( झाडे) वाढविले आहे. अगदी मुंबईत सुद्धा 800 एकर जंगल मी घोषित केलेले आहे. तर शेवटी पर्यावरण हे महत्वाचे आहे. कारण पर्यावरण संपले, तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही.”

 

 

Exit mobile version