Site icon HW News Marathi

संतोष बांगरांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून हिंगोलीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

शिवशंकर निरगुडे | शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोली (Hingoli) जिल्हा प्रमुख पदी दोन जणांची नियुक्ती केली. अनेक दिवसापासून हिंगोलीचा जिल्हा प्रमुख कोण होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.  उद्धव ठाकरे यांनी आज (30 ऑगस्ट) सामनामधून नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात दोन जिल्हा प्रमूख देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्ता येत्या निवडणुकीत संतोष बांगर यांची डोकेदुखी वाढणार आहे. विनायक भिसे पाटील आणि संदेश देशमुख यांची उद्धव ठाकरेंनी हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून व सामनामध्ये ही नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

दरम्यान, कॉंग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे व वंचित बहुजन आघाडीचे नेते अजित मगर यांनी काल (30 ऑगस्ट) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले. व तसेच काही दिवसापूर्वी विनायक भिसे पाटील व माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखिल शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे आत्ता हिंगोली मध्ये शिवसेनेचे वर्चव वाढले आहे. मागच्या निवडणुकीत संतोष बांगर यांना अजित मगर यांनी माहिती दिली होती. तर दुसऱ्या स्थानावर होते तर टारफे हे तिसऱ्या स्थानावर होते. आता मात्र या दोघांनी शिवबंधन बांधले आहे. आणि हे दोन्ही नेते सम विचारी आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत संतोष बांगर यांची डोकेदुखी वाढली आहे.

Exit mobile version