Site icon HW News Marathi

“काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम”, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला

मुंबई | “काही लोके ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोके माझ्यासोबत कायम आहेत”, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आज (29 सप्टेंबर) मातोश्री शिवसैनिकांशी संवाध साधताना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यासोबत जी जुनी मानसी आहेत तर यात आधी नवीन सुद्धा येत आहेत. म्हणजेच काय शिरुरमधील काही लोक ढळली ‘ पण खरी ‘अढळ’ आहेत, ती माझ्यासोबत आहेत. एकाचे नाव एक असते आणि करतो दुसराच. आणि हेही खरेच आहे की, ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे. तिकडे राजकारणामध्ये आता गद्दार लोक आढळली नाही पाहिजेत. कारण तो एक शिक्का लागला. आणि शिक्का मारला.  हा शिवसेनेचा अपमान आहे. मला स्वत: खात्री आहे. खात्री म्हणण्यापेक्षा मी मागेही बोललोय. आपल्या मुंबईमध्ये गटप्रमुखांचा जो मेळावा घेतला. त्याही बोलल्यालो आहे. तेच पुन्हा बोलतोय, पुन्हा पुन्हा बोलेन आपल्याला देवाने दिलेली संधी आहे. देशातील लोकशाही टीकविणे. त्याच्यानंतर खरे हिंदुत्व जोपासणे, टीकविणे, वाढविणे ही देवानी आपल्याला संधी दिलेली आहे.”

तोतयागिरीचा एक कळस करण्याचा प्रयत्न, शिंदे गटावर टोला

हिंदुत्वाच्या मुद्यांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “भले हिंदुत्वाचा जो एक तोतयागिरीचा एक कळस करण्याचा प्रयत्न केला गेला. इतिहासामध्ये एक प्रश्न आहे की ‘तोतयाचे बंड’   काही जणांना माहिती नसेल. नवीन पिढीला काही कल्पना काही कल्पना नाही. आज काही तोतये फिरतात आहेत. नसूते हाता भगवा असून काही उपयोग नाही. हृदयामध्ये भगवा असायला पाहिजे. दसऱ्याला आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. शिवतीर्थावर आपण भेटणारच आहोत. वाजत-गाजत तुम्ही गुलाल उधळत येणारच आहात. पण, मी एक विनंती केली की, शिस्तीनी या. कारण आपल्याकडून काही वेडे वाकडे करून घेण्याचा प्रयत्न करू शकते. सावध रहा, आपल्याला लढाई जिंकायची आहे. मग ती कोर्टातील असेल, निवडणूक आयोगातील असेल. आणि माझे तर म्हणे, असे असेल आहे की, दोन्ही विषय हे वेगळे आहेत. आम्ही जे महत्व ते देतो. जनतेच्या मनला देतो. त्यांच्या मधील जी एक लढाई आहे. ती आपण जिंकलेली आहे. लोकांच्या ज्या भावना आपल्यासोबत आहेत. त्या तशाच ठेवा.”

 

 

 

Exit mobile version