Site icon HW News Marathi

“नागाला कितीही दूध पाजले तरी चावायचा तो चावतोच”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई | “नागाला कितीही दूध पाजले तरी चावायचा तो चावतोच”, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज (3 ऑगस्ट) मातोश्रीवर जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधताना टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणत्याही बैलाला त्रास होणार नाही, याची दखल काळजी घ्यावी. बैल बिचारा आपला शेतकरी राजाच्या कुटुंबांपैकी एक असतो. कारण हे जे गद्दार होते. त्यांना आपण आपले मानले होते. पण गद्दार तो गद्दार काही केले तरी पण, असे म्हणतात, काल, परवा नागपंचमी (Nagpanchami) झाली. नागाला किती दूध पाजले तरी चावायचे तो चावतोच. तसे या सर्वांना आपण इतकी वर्ष प्रेमान आणि मायेने. एक वेगळे निष्ठेचे दूध पाजले, पण अवलाद ही गद्दाराची ती गद्दार राहिली.”

उद्धव ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावताना म्हणाले, “विशेषत:हा वाशिममध्ये दोघे एककीकडे असताना कसे भांडत होते. यांची भांडणे मिटविता मिटविता नाकी 9 येत होती. तरी आपण दोघांना संभाळले. जणू काही वाशिम जिल्ह्यात कोणीच नाही. अशा पद्धतीने आपण त्यांना सगळे काही दिले. आणि हेच थोडे जळगावमध्ये झाले. जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, आता  गुलाबाचे सैनिकांचे काटे बघायचे आहेत. एक गुलाबराव गेला तर दुसरा गुलाबराव आपल्या सोबत आहेत. मी आता राज्यभर फिरणार आहेत. तेव्हा मी तुमच्याशी सविस्तर बोलेन. पक्षाच्या सदस्य नोंदणीवर भर द्यावा. विधानसभेच्या निवडणुका येऊ द्या, मग दाखवून देऊ,” असे ते  म्हणाले.

Exit mobile version