Site icon HW News Marathi

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

मुंबई | “दसरा  मेळावा (Dussehra Melava) हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे,” असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर आज (21 सप्टेंबर) पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांच्या मेळावा घेतला राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरी  उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तोफ डागली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज हे ऐवढी गर्दी जमली आहे. तर दसऱ्याला किती गर्दी असेल. किती पटीत असेल, आणि दसरा  मेळावा हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे. व्यासपीठावर आल्यावर मी एक-दोन गोष्टी बघितल्यात एक तर पहिली रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत एक खुलासा करून टाकतो, नाही तर उद्या चौकट यांची की, संजय राऊत मिंदे गटामध्ये गेले. नाही मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. पण संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. या निश्चयाने लढतायत, आणि या लढाईसोबत आहेत. तलवार हाता घेऊन आघाडीवर आहेत. दुसरे व्यासपीठावर आल्यावर बघितले की, आमचे वडील आहेत का जागेवर कारण मुले पळवणारी टोळी ऐकली आहे. पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे.  मला आश्चर्य वाटते की ऐवढी वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांच यांना सत्तेचे दुध पाजले. आणि आता तोंडाची गटारे उघडली आहेत. जाऊ देत मला त्यांच्यावर बोलण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळे त्यांना उत्तर देत आहात.”

 

Exit mobile version