Site icon HW News Marathi

उद्धव ठाकरेंकडून फेसबूकच्या माध्यमातून पक्षाचे नाव आणि चिन्ह जाहीर

मुंबई | “त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल चिन्ह दिली असून  शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे”, ही तीन चिन्ह आणि पक्षाची  नावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबूकच्या माध्यमातून जनतेला संबोधित करताना सांगितले. उद्धव ठाकरेंनी आज (9 ऑक्टोबर) मातोश्रीवर आमदार, खासदार, पक्ष नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलविली होती. या बैठकीत सर्वांशी चर्चा करत तीन चिन्ह आणि पक्षाची नावे निवडणूक आयोगाकडे उद्या (10 ऑक्टोबर) दोन वाजपर्यंत सादर करणार आहेत

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह नाव दिलय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे. आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले पण गद्दारांनी काय दिलय ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे. आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे म्हणून निवडणुक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृक राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला कुणी हरवणार नाही.”

स्वत: शिवसेना प्रमुख व्हायला निघाले

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हहून मुख्यमंत्री आणि शिंदे गटावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, ” मुख्यमंत्री पद ज्यांना पाहिजे होते. त्यांनी ते घेतले. आणि त्यांच्याबरोबर ज्यांना सगळे काही देऊन सुद्धा मनात धुसपूस होती. आणखी काही होते. आणखी काही होते. नाराज होते. सगळे देत आहेत. तरी आम्ही नाराज होतो. तेही गेले ठिक आहे, आपण काही बोलो नाही यांच्याला काही भाग नाही. पण आपण सहन केले. आता मात्र अति व्हायला लागले. शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको,  मीच व्हायला पाहिजे, इथपर्यंत कोणाकोणाचे मनसुबे असू शकतात. पण आता स्वत: शिवसेना प्रमुख व्हायला निघाले. हे मात्र जरा नाही म्हटले तरी अती होतोय. एक त्याच्यासाठी आवाका काय, किती काय, ही गोष्ट आपल्याला विचार करायची आहे. पुढचे काही बोलण्याचे आधी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय. ते ऐवढ्यासाठी देतोय, काल, परवा शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला. आपला दसरा मेळावा झाला. आपला पारंपारिक दसरा मेळावा झाला. तोही होऊ नये. म्हणून या खोका सूरांनी प्रयत्न केला होता. शिवतीर्थ मैदान शिवसेनेला मिळता कामा नये. पण शेवटी न्याया देवता. ही न्याय देवता या शब्दाला जागली. आणि त्यांनी न्याय दिला.”

 

 

Exit mobile version