Site icon HW News Marathi

रश्मी ठाकरेंनी टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेऊन केली आरती; ठाकरे गट- शिंदे गटाचा सामना टळला

मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ल्यात जाऊन टेंभी नाका देवीची आरती केली आहे. रश्मी ठाकरे या टेंभी नाक्याच्या देवीच्या आरती वेळी मोठ्या संख्येने महिला शिवसैनिकांनी गर्दी करत मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. शिंदे गटाकडून रात्री 8 वाजता देवीची आरती होणार आहे. रश्मी ठाकरेंनी आज (29 सप्टेंबर) देवीच्या आरतीसाठी गेल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिंदे गट आणि शिंदे गट यांच्या सामना होऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, या दोन्ही गटाचा सामना टळला. ठाण्यातील टेंभीनाका देवीचा नवरात्रोत्सव स्व. आनंद दिघे यांनी सुरू केला आहे. त्यावेळी रश्मी ठाकरेंनी पहिल्यांदा स्व. आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यानंतर देवीच्या गाभाऱ्यात जाऊन रश्मी ठाकरेंनी देवीची ओटी भरली असून त्यांच्या हस्ते देवीची आरती केली.

रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या नगरसेविका नंदिनी विचारे आणि ठाण्यातील शिवसेना नेत्या अनिता बिरजे उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या
नवरात्रोत्सवानिमित्ताने ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार

 

Exit mobile version