Site icon HW News Marathi

दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी

मुंबई | शिवसेना दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. यापूर्वी शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागूनही मुंबई महापालिकेने अद्यापही परवानगी दिली नाही. यामुळे शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. या याचिकेवर न्यायालयात उद्या (22 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. या प्रकरमावर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्ड ऑफिसमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज घेतला होता. परंतु, पालिकेच्या जी-उत्तर वॉर्डने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी  ठाकरे गटाचे वकील जोएल कार्लोस यांनी याचिकेतून केली आहे. आणि उद्या होणाऱ्या सुनावणीदरम्यान मुंबई महानगरपालिका, महानगरपालिका आयुक्त आणि जी-उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना याचिकेवर प्रतिवाद करण्यात येणार आहे.

राज्यात मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहेत. बंडखोरी केल्यापासून शिंदे गटाने त्यांनी तेच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, असे मत जी-उत्तरच्या विधी विभागाचे मत असल्याची माहिती एबीपी माझ्याने दिली आहे.

 

Exit mobile version