HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 

मुंबई। राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यात भाजपच्या पाचही उमेवरांचा विजय झाला आहे. तर महविकास आघाडीतील एकाचा पराभव झाला आहे. या निकालात महविकास आघाडीची किती मते फुटली. निकालानंतर महविकास आघाडीआत्मपरीक्षण करण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याची बातमी सर्व माध्यमांनी दिली आहे. यामुळे महविकास आघाडी खासकरून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
विधान परिषदेच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काल (२० जून) मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यात काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली असल्याच्या चर्चा आहे. एकनाथ शिंदे गे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. आता एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे.
संबंधित बातम्या

Related posts

राज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न !

News Desk

आठवलेंची आबा बागुल यांना ऑफर

swarit

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

News Desk