Site icon HW News Marathi

एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी; तर अजय चौधरी नवे गटनेते

मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे पक्षाच्या गटनेते पदावरून हटविण्यात आले. शिवसेनेच्या गटनेत्या पदी अजय चौधरी यांची नवे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजुला नाराज एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सचिव मिलिंद नार्वेकर गेले आहे. शिंदे आणि नार्वेकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने शिंदेंना कोणता प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात अद्यापही माहिती मिळालेली नाही.

विधान परिषदेच्या निकालात शिवसेनेची मते फुटल्याचे चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काल (20 जून) आमदारांची बैठक बोलविली होती. परंतु, या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह 20 आमदार गैर हजर होते. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आले आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी हे आमदार झाले आहेत. अजय चौधरी यांची आमदार होण्याची ही दुसरी टर्म आहे. चौधरींनी मनसेनेचे संतोष नलावडे यांचा पराभव केला होता.

संबंधित बातम्या
विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 
एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी
एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी! – संजय राऊत
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्या ट्वीटमध्ये बाळासाहेबांची आठवण करत म्हणाले…!

 

Exit mobile version