Site icon HW News Marathi

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी ED कार्यालयात दाखल

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. राऊतांना दोन दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. एकनाथ शिंदेंनी काल (30 जून) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.  राऊतांनी आज (1 जुलै) 11.45 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले आहे.

राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना ईडीसंदर्भात म्हणाले, “माझा देशाच्या केंद्रीय तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. माझे काहीच गुन्हा नसल्यामुळे मी चौकशीला सामारे जाणार आहे. चौकशीला सामोरे जाण्याची माझ्यात हिम्मत आहे. मी देशाचा नागरिक आणि राज्यसभेचा खासदार म्हणून कोणत्याही तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीला निर्भिडपणे सामोरे जाणे. हे आपली बाजू मांडणे हे माझे कर्तव्य आहे. मी पळपुटा नाही, केंद्रीय तपास यंत्रणेवर माझा विश्वास आहे. मला पत्राचाळ कुठे आहे, हेत माहिती नाही. एक पत्रावाला मंत्री होते, हे मला माहिती आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या
शिवसेना खासदार संजय राऊतांना ED चे समन्स

 

Exit mobile version