मुंबई | लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असून त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वावर मात करू, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे एकत्र आहेत. महाविकास आघाडीची एकजूट ही संध्याकाळी दिसून येईल, असे विधानही राऊतांनी यांनी केले आहे. विधान परिषदेसाठी आज (20 जून) मतदान सुरू आहे. राज्यासभा निवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव झाला होता. त्यामुळे आजची विधान परिषदेची निवडणूक महत्वाची आहे.
निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर केला, पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “पटोलेंनी जे सांगितले त्यात तथ्य असून आमदारांसोबत असतानाही सतत धमक्या येत होते. या धमक्यांचा काही परिमाण होणार नाही कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असून त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वावर मात करू. विधान परिषदेची निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील.”
राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची किती एकजूट आहे. ती संध्याकाळी आठच्या सुमारास कळून येईल. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हातात हात घालून चालतील. धोका हा शब्द वापरणे योग्य नाही. जर आम्हाला धोका असेल तर आमच्या समोरच्यांना धोका नाही का?, धोका हा एकतर्फी असतो का?,” असावा ही त्यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या
Legislative Council Election : मतदानाला सुरुवात, निवडणुकीत कोण बाजी मारणार?