HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने…!

मुंबई | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिले आहे. राऊतांनी ट्वीट केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे. राऊतांनी आता मध्यवर्ती निवडणुका घेण्याचा इशारा दिला आहे. राऊताच्या ट्वीटमुळे राज्यात नवा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज (22 जून) 5 वाजता शिवसेना आमदार आणि खासदार यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहेत.

 

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडाची भूमिका घेतली असून त्यांचे समर्थक 40 आमदार गुजरातवरून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. “पक्षापासून वेगळी भूमिका घेणाऱ्या आमदारांना त्यांना निवडणुकीना सामोरे जावे लागेल, असे दावण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, एक निश्चित आहे की बरखास्तीचा निर्णय तेव्हाच होऊ शकेल तेव्हा केंद्रातील सरकार, राज्यपाल असतील पर्यायी सरकार येऊ शकत नाही. अशी परिस्थिती असेल तेव्हाच विधानसभा बरखास्तीचा मार्ग येऊ शकतो. परंतु, आता तुम्ही वेगळी भूमिका घेतली तर तुम्हाला निवडणुकीला सामोरे जावे लागेल आणि ती बंड केलेल्या आमदारांची मोठी परिक्षा असेल, अशा इशारा शिवसेनेने दिला आहे,”  असे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

अनेकदा शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली

राऊतांनी ट्वीट करण्याआधी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ठाकरे सरकार भाजपला जर पत्त्याचा बंगल्यासारखे कोसळे असे तर शिवसेनेने राखेतून जन्म घेण्याची ताकत आहे. याआधी अनेकदा शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली आहे. हा शिवसेनेचा 56 वर्षाचा इतिहास आहे. एकनाथ शिंदे हे आमचे मित्र सहकारी आणि जीवाभावाचे नेते असून त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही! – एकनाथ शिंदे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली सभा ?

News Desk

जमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले !

News Desk

राष्ट्रवादीचा नवा गेम प्लॅन, माढ्यातून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी ?

News Desk