Site icon HW News Marathi

“कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…,” राऊतांचा बंडखोरांना इशारा

मुंबई | “कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…”, असे ट्वीट करत बंडखोर आमदारांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. यात ट्वीटमध्ये राऊतांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचाही फोटो पोस्ट केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटात तब्बल 40 आमदार सामील झाले असून राज्यातील राजकीय संघर्षाचा आज (26 जून)  सहावा दिवस आहे.

राऊतांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…”, असे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचाही फोटोला त्यांनी ही कॅप्शन दिली आहे. या फोटोत झिरवळ यांनी कमरेवर हात ठेवलेला फोटो राऊतांनी पोस्ट केला आहे. सध्या सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील पंचातारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आहे.

पक्षासोबत बंड केलेल्या 16 आमदारांना शिवसेनेने नोटीस पाठविली आहे. बंडखोर आमदारांनी नरहरी झिरवळ यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसनुसार, बंडखोर आमदारांना 48 तासांमध्ये त्यांना आपली भूमिका मांडा नाही तर बंडखोर आमदारकी रद्द होऊ शकत नाही.

 

संबंधित बातम्या
‘मविआ’सारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढतोय!

 

 

Exit mobile version