Site icon HW News Marathi

ईडीने संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज PMLA न्यायालयात करणार हजर

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल रात्री उशिरा अटक केली. ईडीने राऊतांची जवळपास १७ तासांची चौकशी केल्यानंतर त्यांना काल (३१ जुलै) अटक केली.  राऊतांना आज (१ ऑगस्ट) सकाळी ९.३० वाजता त्यांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर राऊतांना सकाळी ११.३० वाजता पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. यानंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीने काल सकाळी राऊतांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी ईडी दाखल होती. ईडीने राऊतांची ९ तासांची चौकशी केल्यावर त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलातील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान ईडीने राऊतांच्या भांडूप येथील निवसस्थानासह दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवरही झाडाझडती सुरू केली होती. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेर देखील सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.
ईडीने राऊतांना १ जुलै रोजी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी समन्स बाजावला होता. यानंतर राऊत ईडीच्या चौकशीसाठी हजर राहिले होते. यानंतर राऊतांना ईडीने तीन वेळा समन्स बाजावला होता. यावेळी ईडीने संबंधित घोटाळ्याची कागद पत्रे जमा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु राऊतांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत. ईडीच्या चौकशीला राऊत गैरसमज राहिल्यामुळे ईडीने काल सकाळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या पथकाने राऊतांने काल राऊतांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी केली. राऊत ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नसलेल्ययाचा ठपका ठेव. तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. यानंतर ईडीने राऊतांची पुढील चौकशी कार्यालयात केली. ईडीच्या कार्यालयात राऊतांची ७ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली.
संबंधित बातम्या
नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात
“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?
Exit mobile version