Site icon HW News Marathi

“आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’,” निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “नवे चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल, आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर  संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांना ईडीने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊतांची न्यायालयीन कोठडी आज (10 ऑक्टोबर)  संपली असून राऊतांच्या जामीन अर्जावर आज ईडीच्या पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी पोलीस न्यायालयाकडे घेऊन जात असताना राऊत माध्यमांशी बोलताना चिन्ह गोठवल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

राऊत म्हणाले, “आमच्या पक्षाचे नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल. भविष्यात शिवसेना अधिक सक्षम होईल. कारण आमच्या शिवसेनेचे स्पिरीट आणि शिवसेनेचे रक्त आहे. म्हणून पक्षाचे चिन्ह गोठवल्याने आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आम्ही आणखी जोमाने आम्ही पुढे काम करू. पक्षाला लोकांपर्यंत नेऊ आणि पक्षाच्या नवीन चिन्ह आणि पक्षाच्या नावाला लोकांपर्यंत पोहोचवू.” राऊत पुढे बोलताना पक्षाची गोठवलेल्यांचे उदाहरण देत म्हणाले, ” जन संघ आणि काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. पण ते पक्ष संपले नाही तर उलट आणखी जोमाने आणि ऊर्जेने कार्यकर्ते काम करायला लागले. हे पक्ष आणखी वाढले आणि मोठे झाले. असेच बळ आमच्या कार्यकर्त्यांना देखील मिळेल”,  असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

 

Exit mobile version