Site icon HW News Marathi

HW Exclusive : एकनाथ शिंदेंसारखा अडाणी मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभला नाही! – विनायक राऊत

कोल्हापूर | “एकनाथ शिंदेंसारखा (Eknath Shinde) अडाणी मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभलेला नाही,” अशी खरमरीत टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत बोलले आहेत. राऊतांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात काय पडसात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील एका उद्यानाला मुख्यमंत्र्यांचे नाव दिल्यामुळे वाद सुरू असून या उद्यानाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आज पुण्यात येणार आहे, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर विनायक राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदेंसारखा अडाणी मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभलेला नाही. स्वत:च्या नावाचे उद्यान तयार करायचे. त्या उद्यानाला प्रशासकीय कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बाधून वावरणारे हे एकनाथ शिंदे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार आहे.”

महाविकास आघाडीतील मोठे नेते म्हणून संजय राऊत म्हणून आपण पाहातो, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, यावर काय प्रतिक्रिया द्याल, विनायक राऊत म्हणाले, “संजय राऊतांना जाणून बुजून सुड आणि कपटी भावनेने ईडीमध्ये अडकविलेले आहे. याबद्दल आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल.”

तानाजी सावंत आणि शहाजी बापू हे भाडोत्री लोक

तानाजी सावंत आणि शहाजी बापू यांनी आदित्य ठाकरेंना ठाकरे शौली जमत नाही, अशी टीका केली आहे, असा प्रश्न विचारल्यावर विनायक राऊत म्हणाले, “तानाजी सावंत आणि शहाजी बापू हे भाडोत्री लोक आहेत. या दोघांना मूळ पक्ष नाही, मूळ विचार नाहीये, कालपर्यंत शिवसेनेमध्ये होते. परवाच्या दिवशी शहाजी बापूना लोकांनी आपटले होते. शिवसेनेमध्ये आले आणि त्यांना आधार मिळाला. आणि ते आमदार झाले, आता जर त्यांना आक्कल दाड आली असेल, तर ती नक्की पाडली जाईल.”

 

 

Exit mobile version