Site icon HW News Marathi

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

मुंबई | “शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थावरच होणार,” असा दावा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज (29 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा होणारा दसरा मेळावा होतो. शिंदे गटाने शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर आपला दावा केला होता. यावर राज्यात राजकारण सुरू झाले होते.

या प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, “दसऱ्या मेळाव्यासंदर्भात संभ्रम कोणाचा नाही. तो शिवसेनाचा म्हणजे आमचा होणार. सभ्रम निर्माण करणाऱ्यांनी सभ्रम निर्माण करू द्या. पण शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचा मेळावा हा दसऱ्याला होणार. आणि शिवतीर्थावरच होणार.”

शिंदे गटांनी दसरा मेळाव्यासंदर्भात नेकमे काय म्हणाले

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे दसऱ्या मेळाव्यासंदर्भात म्हणाले, “दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहोत. कारण दसरा मेळावा हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, हे तुम्हाला कळेल,” असे म्हणत त्यांनी दसऱ्या मेळाव्यावर शिंदे गटाने दावा केला आहे. म्हस्के पुढे म्हणाले, “हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले दसरा मेळाव्यावर दावा सांग आहेत.”

 

 

संबंधित बातम्या

“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा”, शिंदे गटाचा दावा

 

 

 

Exit mobile version