Site icon HW News Marathi

केंद्राकडून एकनाथ शिंदेंना ‘झेड’ प्लस सुरक्षा

मुंबई | तब्बल 10 दिवसांनंतर शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे हे आज (30 जून) मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी शिंदेंनाच्या आजून बाजुला सुरक्षा रक्षकांचा मोठा घेराव होता. केंद्राकडून शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. शिंदेंनी बंडमुळे उद्धव ठाकरेंनी काल (29 जून) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे शिवसैनिकांच्या मनता शिंदेविरोधात राग आहे. त्यामुळे कोणताही अनैतिक प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर शिंदेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

शिंदे मुंबई दाखल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. यानंतर शिंदे आणि फडणवीस दोघेही राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. शिंदे आणि फडणवीस या दोघांनी राज्यापालांची भेटनंतर माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

तब्बल 10 दिवसांचा शिंदेंचा असा होता प्रवास 

शिंदे हे विधान परिषदेच्या निकाल लागल्यानंतर म्हणजे 20 जून रोजी मध्य रात्रीपासून गायब होते. शिंदेसह शिवसेनेचे आमदार देखील गायब होते. यानंतर उद्या (21 जून) दिवशी मसजले की शिंदेसह 40 आमदार गुजरातमधील सुरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होती. यानंतर शिंदे गट हा गुवाहाटीला आपला मुक्काम हलविला. यानंतर गेल्या आठवड्या भरापासून शिंदे हे गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते.  शिंदे गटांनी काल (29 जून) साध्याकाळी रॅडिसन हॉटेल मुक्काम हलवून गोव्यात दाखल झाले होते. यानंतर उद्धव ठाकरे हे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तर दुसऱ्या बाजुला भाजपच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना कमलाचा वेग आला आहे.

 

 

Exit mobile version