Site icon HW News Marathi

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाऊन घेणार आशीर्वाद

मुंबई। शिवसेनेचे  बंडखोर नेता एकनाथ शिंदे हे आज मुंबईत परतणार आहेत. शिंदे हे आज (३०जून) मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. शिंदे बाळासाहेबांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा आशीर्वाद घेणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळले आहे. आता राज्यात सत्ता समीकरणाचे दुसरे पर्व सुरू होणार आहेत. भाजप आणि शिंदे गट यांचे राज्यात सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी अद्याप दोन्ही पक्षाकडून अधिकृत घोषणा होण्याची जनता वाट बघत आहे. सध्या उद्धव ठाकरे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत.
शिंदेंनी काल गुवाहाटीमधील कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलाताना म्हणाले, “आमच्याकडे 2/3 आमदारांचे संख्याबळ आहे. तर माझ्यासोबत असलेल्या आमदाारंना कोणतीही बळजबरी केली नाही. सर्व आमदार हे येथे मोकळ्या वातावरणात वावरत असून आम्ही सर्व जण हे शिवसेनेमध्येच आहोत. बहुमताचा अकडा हा आमच्याकडे असल्याचा दावा,” त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमत चाचाणीवर आज सायंकाळी 5 वाजता निर्णय आल्यानंतर शिंदे हे गुवाहाटीमधील रॅडिसन हॉटेल गोवा मार्गे मुंबईत दाखल होणार आहे. गुवाहाटीला दाखल झाल्यापासून शिंदे हे आज देवीच्या दर्शनासाठी बाहेर आले.”
संबंधित बातम्या
एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट देणार

 

Exit mobile version