Site icon HW News Marathi

विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी आज (13 नोव्हेंबर) प्रवेश केला आहे. “कुठल्याही व्यक्तीच्या जो काही निर्णय असेल त्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे”, अशी पहिली प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी विभक्त पती शिंदे गटात प्रवेशावर प्रतिकिया

सुषमा अंधारे म्हणाले, “मी गेली 4-5 वर्ष विभक्त आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून कुठल्याही व्यक्तीच्या जो काही निर्णय असेल त्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे.  मी त्यांच्या राजकीय कारकीर्दीलाही शुभेच्छा देईन. त्यापलिकडे माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही.

दीपाली सय्यद यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे

दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटात प्रवेशसंदर्भात सुषमा अंधारे म्हणाल्या, “दीपाली सय्यद यांना त्यांच्या करिअरसाठी गरजेचे वाटले. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला पाहिजे. सतात्तारी प्रवेश करणे सोपे असते, कारण तिकडे करिअर फार चटकन दिसते. परंतु, संघ्रष काळ सहन करणे जरा अवघड आहे. कदाचित आज शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे ही थोडीशी संक्रमन काळामध्ये आहे. परंतु, आम्ही सर्व निष्ठावंतानी लढायचे ठरविले आहे. यामुळे जात आहेत, त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. आम्ही आमच्या म्हण्यावर ठामपणे राहतो. त्यांना त्यांच्या शुभेच्छा. आम्ही लढायचे ठरविलेले आहे.”

 

 

 

Exit mobile version