Site icon HW News Marathi

“शिंदे गटात लवकरच मोठी फूट पडण्याची तयारी”, संजय राऊतांचा दावा

मुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार गजानन किर्तिकर यांना शनिवारी (12 नोव्हेंबर) शिंदे गटा प्रवेश केला. यानंतर गजानन किर्तिकर (Gajanan Kirtikar) यांचे पुत्र अमोल किर्तिकर (Amol Kirtikarr) यांनी शिंदे गटात न जाता निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल किर्तिकरांनी आज (13 नोव्हेंबर) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. “शिंदे गटात लवकरच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू आहे”, असा दावा राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

राऊत म्हणाले, “गट कोणता काय मते व्यक्त करतो, त्यात मला पडायचचे नाही. पण, राज्यात मध्यावधी निवडणुकाची तयारी सुरू झालेली आहे. यांचा अर्थ असा आहे, जे म्हणतात हा आमच्याबरोबर, तो आमच्याबरोबर त्यांच्या गटातच मोठी फुट पडण्याची तयारी सुरू झालेली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, हे लक्ष्यात घ्या.”

उपमुख्यमंत्री आणि विरोधकांनी एकत्र येऊन संवाद साधावा 

महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जाण्याच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक प्रकल्प जात आहेत. यावर कोणीच काही बोलत नाही. एकमेकांवर चिखल फेक करण्यापेक्षा, एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत. कोण ओरबडतेय, यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र खचला महाराष्ट्र कमकमुतव झाला तर आपण राजकारण करायला उरणार नाही. याचे भान आताच्या राज्यकर्त्यांनी आणि आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या लोकांनी ठेवले पाहिजे. महाराष्ट्राचे नुकसान होत असताना एकमेकांवर खापर पोडण्यापेक्षा हे कसे रोखता येईल. महाराष्ट्राला भगदाड पाडण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्र आर्थिक, औद्योगिकदृष्य्या कमजोर करून. महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्यासाठी पडद्यामागे प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी सध्या एकमेकांची उणी दुणी आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे निदान याबाबतीत तक्रारी बंद केल्या पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील प्रमुख लोकांशी संवाद साधून. यासंदर्भात संवाद साधणे गरजेचे आहे.”

अमोल किर्तिकर ठाकरे गटात राहिल्याचा आनंद

अमोल किर्तिकर ठाकरे गटात राहिल्यासंर्भात राऊत म्हणाले, “आपली जी मूळ पक्ष संघटना आहे. त्याबरोबर अमोल कर्तिकर राहिले आहेत. याचा आम्हाला सर्वांच आनंद आहेत. 100 दिवसांनी तुरुंगातून सुटल्यावर जेव्हा आनंद मला झालेला नाही. त्यापेक्षा जास्त आनंद आज अमोल भेटाला आला. आमोल पक्षाबरोबर अमोलने वडिलांना समजविण्याचा प्रयत्न केला. गजा भाऊना समजविण्याचा काटोकाट प्रयत्न केला. असेच आमचे जे कडवट लोक आहेत. अमोलसारखे त्यांच्याचबरोबर आता शिवसेना प्रवाह पुढे जाणार आहे.”

 

 

 

Exit mobile version