Site icon HW News Marathi

“…शरद पवारांचा सल्ला घेतो, मग मी काय घेत होतो?”, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई। “शरद पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो?”, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ९७ व्या जयंती निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करताना राज्य सरकार, मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मुद्यावरून हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “परवा बाळासाहेबांचाचा माणूस, काल मोदींचा माणूस आता शरद पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो? सरदार पटेल, बाबासाहेब, बाळासाहेब पण आमचेच. मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय तुम्ही कुणीच नाही हे तुम्हीच सिध्द केले. या महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २-३ दिवसांपूर्वी मुंबईत येऊन गेले होते. मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी काही उद्धघाटनाची कामे केली. परंतु, आम्ही सुरू केलेल्या कामांचे उद्घाटन त्यांनी केले, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधाना लगावला आहे.
Exit mobile version