Site icon HW News Marathi

“भाजपला सगळेच आपल्या बुडाखाली घ्यायचे, हाच त्यांचा मनसुबा”, उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई | “भाजपला सगळेच आपल्या बुडाखाली घ्याचे,  हाच भाजपचा मनसुबा आहे,” असा टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज (17 नोव्हेंबर) स्मृतिदिनी आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी दादर येथील शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेबांच्या स्मृती स्थळात जाऊन अभिवानद केले.  यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि भाजपवर हल्ला बोल केला आहे.

 

विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या काळ स्मरकाचे काम पूर्ण होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “आतापर्यंत त्यांनी बरेच काही म्हटले, ते काय तसे पूर्ण झालेले नाही.” स्मारकाचा ताबा राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी होत आहे, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “एक बघा भाजपला सगळ्यांचा ताबा पाहिजे. तो त्यांचा की नाही, हे देशातील जनतेनी ठरवायचे आहे. जिथे त्यांना पूर्ण देशाचा ताबा पाहिजे. तिथे स्मारकाचे काय?, त्यामुळे त्यांना (भाजप) सगळेच आपल्या बुडाखाली घ्याचे,  हाच भाजपचा मनसुबा आहे. शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे.”

 

शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली

 

शिवसेना प्रमुख म्हटले की, संघर्ष हा आलाच आन्यायविरोद्ध लढा हा आलाच. एका दृष्टीने आजचा हा स्मृती दिन मला थोडासा वेगळा का? वाटतोय. कारण 10 वर्ष लागले, काही जणांना शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेना प्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्ष लागली आताचे शिवसेना प्रमुखांबद्दलचे त्यांचे उबाण हा बाहेर आलेला आहे. अनेक शिवसेना प्रेमी आहेत. शिवसेना प्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचे प्रेम आणि त्यांच्या भावना व्यक्त करणे यात काही हरकत नाहीत. मात्र, ते करताना, याचे कुठे बाजार होऊ नये. ही माझी नम्र भावना आहे. आणि त्या दृष्टीने विचार करूनच बाजारून पणा दिसता कामा नये. विचार व्यक्त करायला कृती असतावी लागते. कृतीतून सुद्धा विचार व्यक्त होतात. कृती नसेल, तर तो विचार हा विचार राहत नाही. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये. त्यांच्या बद्दल मी तुमच्या भावना प्रेम सगळे समजू शकते. त्यांना साजेच काम आपण करावे. ही माझी त्यांना विनंती आहे.”

 

व्यंगचित्रकार प्रदर्शनासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना प्रमुखांना जाऊन 10 वर्ष होऊन गेली. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. सहाजिक आहे, शिवसेना प्रमुख हे केवळ शिवसेना प्रमुख नव्हते. त्यांच्यामध्ये अनेक पैलू होते. त्या पैलूचे दर्शन घडविणारा एक जिवंत अनुभव इथे मुंबई महापौरांचा बंगला आहे. त्या स्मारक कसे होणार आहे. याचे प्रजेंटेशन हे 8-10 दिवसापूर्वी आपण सर्वांनी पाहिले. सहाजिकच आहे शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर व्यंगचित्रकार ही ओळख ओघाने आलीच. आणि म्हणूनच मी आज मुदामून तुमच्यासमोर का आलोय. केवळ आपल्याशी बोलायचे हा एक उद्देश तर नक्की आहे. त्याचबरोबर इथेही शिवसेना प्रमुखांनी काढलेली व्यंगचित्र आहेतय. किंवा तर चित्रकार आहे, त्यांच्या दृष्टीतून देखील बाळासाहेबांचे चित्र काढलेली आहेत. मी आपल्याला विनंती करतोय की ही व्यंगचित्र म्हणा. ही आपल्या तम्माम शिवसेना प्रमुखांच्या प्रेमिंना आणि देशातील इतर नागरिकांना त्यांचे दर्शन आपल्या माध्यमातून संपूर्ण देशाला घडवावे. अशी नम्र विनंती आपल्याला करतोय.”

 

 

 

Exit mobile version