Site icon HW News Marathi

“केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारचे पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात”, उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई | “केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत”, असा टोला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेला लगावला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बुधवारी (9 नोव्हेंबर) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने  राऊतांना जामीन मंजूर केला. यानंतर तब्बल 100 दिवसांनी राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. यानंतर राऊतांनी आज (10 नोव्हेंबर) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर मातोश्रीवर संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “संजयच्या धाडसाचे कौतुक आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, संजय मी मुद्दांन त्याला अरेतुरे बोलयोय. ऐरवीही मी त्याला अरेतुरे बोलतोय. तो ही माझ्याची त्याच नात्याने अरेतुरे बोलतो. संजय हा शिवसेनेचा नेता आहे. शिवसेनेचा खासदार आहे. सामनाचा कार्यकारी संपादक आहे. आणि त्याचबरोबरीने तो माझा जीवलग मित्र सुद्धा आहे. आणि मित्र तोच असतो की, जो संकटाच्या काळामध्ये न डगमता लढत असतो. तसा हा लढणार मित्र संकटात केवळ सोबतच नाही राहत. तर तो लढतोय, अनेक जण आपण पाहतोय. आणि आता स्पष्ट झालेय, काल न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे. त्या न्याय देवतेचे मी आभार मानतोय. पण, या निकाल पत्रामध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणाने काही आपले निरीक्षण न्यायालयाने नोंदविली आहे. त्यामुळे आता जगजाहीर झालेले आहे की, केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीवप्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्यांच्या अंगावर जा म्हटले की, त्यांच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीर पणे जात आहेत, आणि हे संपूर्ण जग आणि देश बघत आहेत.”

केंद्रीय यंत्रणेचा दुर उपयोग करून अनेक पक्ष फोडले

केंद्र सरकार न्यायाव्यवस्थेचा दु उपयोगावर उद्धव ठाकरे म्हणाले,  “एक एक उदाहरण त्यांची झाले तर गेल्या काही दिवसातील उदाहरण आपल्यासमोर आहेत. आणि सर्वा महत्वाचे म्हणजे न्याया देवता सुद्धा आपल्या अंकीत करण्याची सुरुवात केंद्र सरकार करते की काय अशा पद्धतीने गेल्या 8-15 दिवसात केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजूजू यांची वक्तव्य आहेत. त्यांनी या वृदावंतीवरती शंका उपस्थित केलेली आहे. एकूनच सर्व सामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालय असते. जर न्यायालयच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल. तर देशातल्या तमाम जनतेनी त्याचा विरोध केला पाहिजे. न्याया देवतेचे महत्व तिच्यावरीत भाष्य करने हा सुद्धा गुन्हा आहे. त्यावर केंद्रीय कायदा मंत्रीच भाष्य करत आहेत. हा गुन्हा होऊ शकतो की नाही याची दखल न्याया देवता घेईलच. पण एक नक्की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणेचा दुर उपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले. अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेकायदेशी अटक केली जात आहेत. खोट्या केसेस केल्या जात आहेत. कालचा दणका न्यायालयाने केंद्र सरकारला देऊनही कदाचित कुठल्या तरी केसेमध्ये परत संयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल. कारण ऐवढ्या चपराकीनंतरही लाज वाटण्याऐवढे संवेदनशील हे केंद्र सरकार असते. तर अशा घटना घडल्या नसत्या.”

आमच्याकडे लांब पल्ल्याची तोफ

 

कर नाही त्याला डर कशाला, नुसते घाबरुन जे पक्षातून पळून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धडा आहे. न्यायालय आणि न्याय देवता निपक्षपाती पणाणे निर्णय देत आहे. हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी खूप मोठे आणि चांगले लक्षण आहे. कालचे जे निकाल पत्र आहे. ते निकाल पत्र हे मार्गदर्शक म्हणून सर्वांनीच त्याचे आचरण करावे आणि आम्लात आणायला काही हरकत नाही. शिवसेनेची तोफ आता पुन्हा एकदा मैदानात उतरते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तोफ तोफच असते, तोफ मैदानात आणावी लागत नसते. आता तुम्हाला या तोफेचा पल्ला माहिती आहे. तोफेचे पल्ले माहिती असतात. काही तोफ म्हणून आणतात आणि तोफेचे गोळे तिल्या पायाशी पडतात. ही आमच्या लांब पल्ल्याची तोफ आहे.

 

Exit mobile version