Site icon HW News Marathi

“ऋतुजा रमेश लटकेंना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी दबाव”, अनिल परबांचा आरोप

मुंबई | “ऋतुजा रमेश लटकेंना (Rituja Ramesh Latke) शिंदे गटाकडून लढण्यासाठी दबाव टाकला जात आहे”, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अवघा दोन दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फौरी सुरू आहेत,  अनिल परब यांनी आज (12 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन ऋतुजा रमेश लटकेंना यांच्या राजीनामा मुंबई महानगर पालिका नामंजूर करण्याचे राजकारण करत आहे. तर ऋतुजा रमेश लटकेंना शिंदे गट त्यांच्या सामील होण्याचा दबाव टाकत असून त्यासाठी शिंदे गटाने ऋतुजा रमेश लटकेंना मंत्रिपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे, अशा खळबळजनक दावा पत्रकार परिषदेतून अनिल परब यांनी केली आहे.

अनिल परब म्हणाले, “ऋतुजा रमेश लटकेंनी ऐवढे घाबरून जाण्याचे कारण नाही. ऋतुजा रमेश लटकेंना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून वर्तमान पत्रातून येणाऱ्या बातम्या वाचतोय. माध्यमांकडून काही माहिती मिळते ती अशी आहे की, शिंदे गट त्यांच्यावर दबाव देत आहे. आमच्याकडून तुम्ही निवडणूक लढणार असला. तरच तुमचा राजीनामा मंजूर होईल. काही जणांनी मला असेल सांगितले की, शिंदे गटाकडून ऋतुजा रमेश लटकेंना मंत्रिपदाची ऑफर देणे चालू आहे. परंतु,  आम्हाला पूर्ण खात्री आहे की, रमेश लटके यांचे कुटुंब हे शिवसेनेशी अतिशय प्रामाणिक आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला ते कुठेही बळी पडणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. याबाबतीत आम्ही सतत मागणी करतोय की, मी आयुक्तांना, असे देखील सांगितले. तुम्ही मला असे लिहून त्या आपण ऋतुजा रमेश लटकेंचा राजीनामा का मंजूर करत नाही. त्याचे कारण दिले तर आम्हाला पुढे त्याबाबती विचार करता येईल. परंतु, ते कारण देखील त्यांनी आजूनपर्यंत दिलेले नाही. निवडणुकीचे अर्ज भरण्यास पुढेचे दोन दिवस बाकी आहेत. जाणून भुजून रमेश लटकेंच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला काढण्यासाठी किंवा शिंदे गटा घेण्यासाठी हा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही निषध करतो. आणि महापालिका आयुक्तांना विनंती करतो की ताबडतोब हा राजीनामा मंजूर करा. रमेश लटेक यांच्या पत्नीने स्वत:ची नोटीस देखील दिलेली आहे. आज आम्ही न्यायालयात देखील गेलोलो आहे. दुपारी न्यायालयात आम्ही सांगू. आणि या प्रकरणी आम्ही न्यायालयाकडे न्याय मागणार आहे.”

 

 

Exit mobile version