Site icon HW News Marathi

“…अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारींना टोला

मुंबई। “शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना लगावला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (१२ फेब्रुवारी) भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यपाल आणि महविकास आघाडीमध्ये संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मग राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी मुळे महाविकास आघाडीतील त्यांच्यासोबत मतभेद झाले होते. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आदी मुद्यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष झालला उभ्या महाराष्ट्राने पाहिला.

 
उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात भगतसिंग कोश्यारी यांचाबद्दल बोलताना म्हणाले, “आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधील गागाभट्ट आले होते. तसेच आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहे. तर शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले.”
सतत वाद ओडावून घेणारे भगतसिंह कोश्यारी  यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मंत्रिमपद देखील सांभाळले होते. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी निुयक्ती होण्याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.
Exit mobile version