HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचा 56 वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इनमध्ये होणार साजरा; उद्धव ठाकरे काय बोलणार?

मुंबई | विधान परिषद निवडणुकीसाठी राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे.  विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या सर्व पक्षांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. शिवसेनेचे आज (19 जून) होणार वर्धापन दिन  हॉटेल वेस्ट इनमध्ये साजरा होणार आहे. या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आमदारांना आणि शिवसैनिकांना संबोधितन करणार आहेत.

मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून हॉटेलच्या दिशेने रवाना झाले असून शिवसेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे युवा नेता आणि राज्याचे पर्यावरण आदित्य ठाकरे आदी नेते मंडळी हॉटेलमध्ये पोहोचले आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने वर्धापन दिना निमित्ताने एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणातील एक वाक्य दाखवण्यात आले. “५६ वर्षे जनसेवेची.. प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने तळपत्या शिवसेनेची… पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!,” शिवसेनेच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट केले आहे.

 

संबंधित बातम्या
“विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
HW Exclusive : ईडी, सीबीआय अन् आयटी तपास यंत्रणा पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेरील शेपूट हलवणार कुत्रे! – भाई जगताप

 

Related posts

काकांना उमेदवारी द्या, मग मी भाजप सोडतो !

News Desk

आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय ? मारायचे की सोडायचे ?, पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

भाजप-सेना युतीच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक टीका

News Desk