HW News Marathi
राजकारण

विधानसभेतील शिवसेनेचे कार्यालय सील

मुंबई। विधासभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोवण्यात आले आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी म्हणजे आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षासाठी मतदान होणार आहे. तर उद्याच्या अधिवेशनात (4 जुलै) राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधानसभेतील शिवसेनेच्या कार्यलयाला सील करण्यात आले.  यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. शिंदेसह 39 आमदारांनी पक्षासोबत बंड केले. यानंतर तब्बल दहा दिवस हा सत्ता संघर्ष सुरू होता. बंडखोरी आमदारांनी आपणच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळात 2/3 आमदारांनाचा पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अखेर राज्याच शिंदेनी मुख्यमंत्री तर  शपथ घेतली.

विधानसभा अध्यक्षांची आज निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्यात विधानसभा निवडणुकीत मतदान सुरु आहे.

संबंधित बातम्या
विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन; विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी आज होणार निवडणूक

 

Related posts

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील स्विकारणार?

News Desk

मी शिवसेना सोडली कारण….!

News Desk

भाजप प्रवेशानंतर प्रथमच मोहिते-पाटील आणि शरद पवार समोरासमोर येणार !

News Desk