Site icon HW News Marathi

‘दैनिक सामना’ मुख्य पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात; राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

मुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये (Saamana)  शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात छापून आली. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दैनिक सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या फोटोत “महासंकल्प पहिल्या टप्प्यातील नियुक्तीचे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम” निमंत्रण छापण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये शिंदे गटावर टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे देखील नाव आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतील खासदार असल्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्यांचे नाव देण्यात आले असल्याचे म्हटले जाते आहे.

या दैनिक सामनाच्या जाहिरातीत म्हणाले, “स्वातंत्र्याची ७५ वर्षे… एका वर्षात _७५,००० रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा….
महासंकल्प पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दृकश्राव्य संदेश,” असे लिहिले आहे. तर हा कार्यक्रम आज (3 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केला आहे.

 

Exit mobile version