HW News Marathi
राजकारण

शिवसेना-भाजपकडे प्रत्येकी अडीच वर्षे राहणार मुख्यमंत्रीपद ?

मुंबई | “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळेल असा निर्णय झाला आहे. या बैठकीला उपस्थित नसलेल्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी युतीचे वातावरण बिघडवू नये”, असे ट्वीट युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युतीत अगदी विधानसभेच्या जागावाटपावरून मुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर धुसफूस सुरु आहे.

अमित शाह यांनी रविवारी झालेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत एक मोठी सूचना केली होती. “लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकदिलाने, एकत्रितपणे काम केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही तसेच होईल. परंतु, मुख्यमंत्रीपद हे भाजपलाच मिळेल याची खबरदारी मात्र पक्ष संघटनेने घ्यावी”, अशा थेट सूचना अमित शाह यांनी केली होती. अमित शाह यांच्या या सूचनेमुळे शिवसेनेत तीव्र नाराजीचे वातावरण होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगींचा अजब दावा भगवान हनुमान दलित

News Desk

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू !

News Desk

बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही !

News Desk