Site icon HW News Marathi

“काहींची भाषणे फारच लांबली होती, नको इतकी लांबली…”, अजित पवारांचा शिंदेंना टोला

मुंबई | “काहींची भाषणे फारच लांबली होती. नको इतकी लांबली. आता कोणाती लांबली ते तुम्हीच विचार करा,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दसरा मेळाव्यातील (Dasara Melava) भाषणावरून लगावला. अजित पवार यांनी आज (6 ऑक्टोबर) बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी विकास कामाची पाहाणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाध साधला. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा दसरा मेळाव्यावरून प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर देताना टोला लगावला.

काल दोघांची भाषणे झाली तुम्हला कोणाचे भाषण आवडले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “अवडी निवडी करता भाषण नव्हती. खर तर जे शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापन केल्यापासून विचार ऐकण्याकरिता दसऱ्याच्या शुभमुर्तावर शिवाजी पार्कला येईचे त्या काही पिढ्या आहेत. ते ऐकायलाही लोक आलेली होती. आणि तिथे मोठ्या प्रमाणात 10 कोट रुपये, एसटीला भरुन बसेसची व्यवस्था केली होती. मला काहींनी सांगितले की, या बसेस तिकडे गेल्यामुळे सणाच्या दिवशी इतर सर्व सामान्य प्रवाशी अडचण झाली. बसेस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची अचडण झाली. अशा गोष्टी करता कामा नये.  शेवटी जसा त्यांना त्यांचा दसरा मेळावा महत्वाचा होता. परंतु, ज्या जनतेच्या करता गाव तिथे एसटी हे धोरण राबविले गेले. आणि त्या प्रवाशांन करता गाव तिथे एसटी हे धोरण राबविले गेले. त्या प्रवाशांकरता ज्यांच्याकडे वाहन नसते. परंतु, नातेवाईकांकडे काही कामाच्या करता इकडून तिकडे जायाचे असते. पण,  कशा करता त्यांचा वापर झाला. वगैरे वगैरे काही काहींची भाषणे फारच लांबली होती. नको इतकी लांबली. आता कोणाती लांबली ते तुम्हीच विचार करा”

 

अजित पवार म्हणाले, “सगळ्यांनी बघितले आहे ना. बीकेसीच्या मेळाव्यात काय मार्गदर्शन झाले. एकशान शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केले. हे उभ्या महाराष्टांनी पाहिले. तुम्ही सगळ्यांनी पाहिले आहे. आणि आम्ही पण पाहिलेले आहे. त्यांनी त्यांचे त्यांचे विचार सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत. हा त्यांचा पार्टी अंतर्गत विषय असल्यामुळे त्यांना ऐकण्याचा सगळ्यांना कुतुहल होते. आणि त्यात दसऱ्या सारखा महत्वाचा दिवस असताना. सगळ्यांनी पाहिले दोन्हीकडे गर्दी होती. कशी गर्दी होती, काय होती. तुम्ही मीडियांनी पण वेगवेगळ्या लोकांना विचारले की, तुम्हाला चहा मिळाला का?, नाश्ता, पाणी, जेवण मिळाले का?, यावेळेस काही लोकांनी सांगितले की, आमला कश्याला आणले हेच माहिती नाही?, आम्हाला कोणी जेवायला विचारत नाही, चहा विचारत नाही, असे आम्ही टीव्हीवर बघितले. काल माझे सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत कार्यक्रम होते. मी रात्री आईला भेटायला गेलो. तेव्हा मी तिथे टीव्ही लावला आणि त्यांची भाषणे ऐकली. पहिले भाषण उद्धव ठाकरेंचे झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेचे भाषण झाले. आपणही पाहिले की दोघांनी काय भाषणे केली. त्याबद्दल आम्ही जास्त ठिका ठिप्पणी करण्याचे कारण नाही. कारण एकीकडे ज्यांच्याबरोबर अडीच वर्ष सरकारमध्ये काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मी देखील त्यांच्याबरोबरीने काम केले, अशांचे विचार होते. आणि ऐकीकडे ज्यांनी जूनमध्ये काही राजकीय निर्णय घेतला. मी त्यांच्याही बरोबर मंत्रिमंडळात सीनियर मंत्री म्हणून काम करत होते. या राजकीय बाबी आहेत.  आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रात राज्यातील जनतेनी विशेषत: हा  मतदारांनी विशेषतः शिवसैनिकांनी यांनी निर्णय घ्याचा.”

 

 

 

 

 

Exit mobile version