Site icon HW News Marathi

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

मुंबई | “महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे कुठेही त्यांचे मन दुखावले असतील तर सॉरी”, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर यांच्यावर आक्षेपार्ह भाषेचा वापर करत टीका केल्यानंतर म्हणाले.  औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभेच्या परिस्थितीचा आढावा गेले होते. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तारांनी सुप्रिया सुळेवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा   व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या विरोधात आंदोलन केले.

 

सत्तारांच्या घराच्या काचा फोडल्या, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “माझ्या घरावर कोणी काचा फोडल्या. मला त्याची भीती वाटत नाही. मी आताही बोलू लागलो की, मी महिलांबद्दल आदर करणारा कार्यकर्ता आहे. मी कोणाच्याबद्दल भावना दुखावणारे शब्द मी बोललो नाही. आणि बाकीच्या महिला ज्या असतील, महाराष्ट्रातल्या किंवा देशातीलमहिलांचे कुठेही त्यांचे मन दुखले असतील तर सॉरी.”

 

मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता

अब्दुल सत्तार म्हणाले, “महिला भगिनींना कुठे तरी वाटत असेल की, मी जे बोललो, त्यांची मने दुखली. तर मी जरूर खेद व्यक्त करेल. परंतु, मी असे काही बोललो नाही. मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्यांच्या डोक्यामध्ये परिणाम झाला. आताही बोलू लागलो. परंतु, त्याचा कोणी तरी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांच्या बद्दल काढू लागले. महिलांबद्दल एक शब्द ही मी बोललो नाही. याच्या पुढेही बोलणार नाही. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असेल. सर्व सन्मानिय आमदार सर्व महिलांचा सन्मान करतात. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे.”

मी महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही

सत्तार पुढे म्हणाले, “मी कोणत्याही महिला भगिनींबद्दल बोललो नाही. आणि जे पुरुष मंडळी किंवा याला तेल टाकण्याचे काम करू लागले. मी कोणत्याही महिलेचे मन दुखले असेल. त्याबद्दल महिला भगिनींच्या बद्दल खेद व्यक्त करतोय. परंतु, इस्पेशल आम्हाला कोणी तरी टोचण्याचा प्रयत्न करत असेल. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल. आमच्याबद्दल कोणी तरी खोके नावा आरोप करत असेल. तर मी त्यांच्याबद्दल जे बोललो, ती आमच्याकडची ग्रामीण भाषा आहे. ही भाषा शहरी भाषा नाही. तुम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये फिरी कशा पद्धतीने लोक बोलतात हे कळेल. पण, मी महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही.”

संबंधित बातम्या

अब्दुल सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

 

 

 

Exit mobile version