Site icon HW News Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापैकी कोण निवडणूक लढवणार?

मुंबई | शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाती जागा रिक्त झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप (BJP) लढवणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती ‘एबीपी माझा’ने दिली आहे.

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्या निधन झाले. लटके हे 11 मे रोजी दुबईला फिरण्याठी गेले होते. लटके दोन वेळा अंधेरी पूर्वचे आमदार म्हणून निवडणून आले होते. लटकेंच्या निधनानंतर शिवसेनेकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, शिंदे गटा ऐवजी भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Exit mobile version