Site icon HW News Marathi

संजय राऊतांच्या ED च्या कारवाईबाबत अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl case)  यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. राऊतांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी आज (31 जुलै) ईडीचे दाखल झाले. गेल्या सात तासांपासून ईडी राऊतांची चौकशी सुरू आहे. ईडी राऊतांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरील ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात विरोधासभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना ईडीने राऊतावरी कारवाईसंदर्भात सावध प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, “राऊतांवर ईडीने केली कारवाई ही बातमी मी तुमच्याकडून ऐकली आहे. तुम्हाला माहिती आहे की, पाठीमागच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीची नोटीस आल्या आहेत. त्या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यांना स्वयथा दिलेली आहे. आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. मग त्या आयटी, ईडी, सीबीआय किंवा राज्य सरकारच्या एसीबी, सीआयडी, पोलीस क्राइम या सगळ्या वेगवेगळ्या विभागात काही तक्रारी आल्या तर त्याबद्दल चौकशी करण्याचा अधिकार आहे. यात प्रत्येक नागरिकांच्याबाबत देखील चौकशी करण्याचा अधिकार आहे. राऊतांकडे पुन्हा पुन्हा काय येतात. याबाबत सर्वात अधिक माहिती हे तेच सांगितील. त्या यंत्रणांना देशातील कुठल्याही चौकशी करण्याचा अधिकार आहे. यात तुमचाही समावेश आहे.”

संबंधित बातम्या

“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

माफीय संजय राऊतला आता हिशोब द्यावा लागणार! – किरीट सोमय्या

Exit mobile version