Site icon HW News Marathi

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला आजपासून सुरुवात; राहुल गांधींचं भावनिक ट्वीट

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वखाली आजपासून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) यात्रेला सुरुवात होत आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी असणार आहे. काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये याची तयारी सुरू होती. अखेर आज या यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आज (7 सप्टेंबर) ट्विटरवर एक भावनिक नोट शेअर केली. यात राहुल गांधींनी म्हटले, “द्वेष आणि विभाजनाच्या राजकारणात मी माझे वडील गमावले. मी माझा प्रिय देशही गमावणार नाही. प्रेमाचा द्वेषावर विजय होईल. आपण सर्व मिळून जिंकू.”

दरम्यान, ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशानमधून जाणार आहे. दररोज 21 किलोमीटर चालल्यानंतर, 150  दिवसांत 3 हजार 570 किलोमीटर अंतर कापून ही यात्रा काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. या यात्रेत ठीक ठिकणाहून लोक सहभागी होणार आहे. कन्याकुमारी येथील ‘गांधी मंडपम ‘ येथील कार्यक्रमादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन देखील होते.  या यात्रेची औपचारिक यात्रेला सुरुवात असून ही पदयात्रा ११ सप्टेंबर रोजी केरळला पोहोचणार आहे.

 

या यात्रे राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते 8 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी राहुल सकाळी 7 वाजता श्रीपेरंबदुर येथील राजीव गांधी स्मारकाला भेट देणार आहेत.  त्यावेळी दुपारी 3 वाजून 5 मिनीटांनी तिरुवल्लुवर स्मारकाला भेट देणार आहे. त्यानंतर राहुल गांधी दुपारी 3.25 वाजता विवेकानंद स्मारकाला भेट देतील आणि दुपारी 3.50 वाजता कामराज स्मारकाला भेट देणार आहेत. यानंतर राहुल गांधी कन्याकुमारी येथील गांधी मंडपम येथे सायंकाळी 4.10 वाजता सर्वधर्मीय प्रार्थना सभा होणार आहे. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सायंकाळी 4.30 वाजता गांधी मंडपममध्ये राहुल गांधींना तिरंगा सुपूर्द करतील. 4.40 वाजता सर्व नेते गांधी मंडपापासून काही अंतरावर असलेल्या सभेच्या ठिकाणी चालत जाणार असून सायंकाळी 5 वाजता जाहीर सभेत भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होणार आहे, असे समजले जात आहे. ही यात्रा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध वातावरण करण्यासाठी सुरु केले आहे.

 

 

Exit mobile version