HW News Marathi
राजकारण

अब्दुल सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यावर आक्षेपार्ह भाषेचा वापर करत टीका केली. यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सत्तारांविरोधात आंदोलन सुरू असून सत्तारांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “मी बोलणार नाही”,असे एक वृत्तवाहिनीशीशी बोलताना म्हणाले.

 

सत्तारांच्या टीकेवर सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या, “अब्दुल सत्तार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. परंतु, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्यभरात सत्तारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  सत्तारांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर म्हणाले, “सत्तारांनी येत्या 24 तासांत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागावी. अन्यथा आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. सत्तारांना आम्ही त्यांची लायकी दाखवून देऊ.”

 

सुळेवर टीका करताना सत्तार काय म्हणाले

सुप्रिया सुळेंनी सत्तारांवर टीका करताना म्हणाले, “पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का?” सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत सत्तार म्हणाले, “ते तुम्हाला हवे आहेत का?, असे त्यांनी म्हटले. या विधाननंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करत आहात”, असे म्हणत सत्तारांच्या ऑफरला त्यांनी उत्तर दिले. यावर उत्तर देताना सत्तारांची जिभ घसरली ते म्हणाले, “इतकी भिकारी*** झाली असेल तर सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ,” असे म्हणाले.

संबंधित बातम्या

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा भीमा-कोरेगाव विजय दिवसासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

News Desk

म्हणून… राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही

News Desk

उद्या सुधीर मुनगंटीवारांचे वनमंत्रीपद जाऊ शकते | राज ठाकरे

Gauri Tilekar