Site icon HW News Marathi

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर…! अनिल परबांची माहिती

मुंबई | मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तर औरंगाबादच्या नामांतर करून संभाजीनगर करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाच्या बैठकी बोलवण्यात आली. मंत्रिमंडळाची आज (28 जून) झालेल्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही नसून पोलीस भरती आणि औरंगाबादचे नामांतर आदी विषयांवर चर्चा झाल्याचे अनिल परब यांनी माध्यमांना माहिती दिली.

“गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना औरंगाबादेच नामांतर करून संभाजीनगर करावे, अशी मागणी करत होते. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा विषय आणावा आणि मंजूर करावा, अशी विनंत मुख्यमंत्र्यांना केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा होत नाही. यात राजकीय धोरणे यासंदर्भातील निर्णय होत असतात,” अशी माहिती अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची उद्या (29 जून) बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित उद्या होण्याऱ्या बैठकीत राज्याच्या राजकीय संघर्ष परिस्थितीवर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात 5 मंत्री आणि 4 राज्यमंत्री बंडखोरी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल (27 जून) मंत्रिमंडळात फेरफार केला आहे.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल

संबंधित बातम्या
ठाकरे सरकारने बंडखोरी केलेल्या 5 मंत्री आणि 4 राज्यमंत्र्यांच्या खात्यात केला फेरबदल
Exit mobile version