HW News Marathi
राजकारण

शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला धक्का नाही

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो. शिंदे गटाच्या कार्यकारणीत दीपक केसरकर यांची प्रवक्ते पदी निवड केली आहे. तर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला स्पर्श देखील केलेले नाही. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड केली. शिंदे गटाची आज (18 जुलै) ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडल्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

दरम्यान, या बैठकीत शिवसेनेचे 14 खासदार उपस्थित असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.  शिंदे गटाच्या कार्यकारणीत रामदास कदम, आनंदराव आडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा या नेत्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाने आज घेतलेल्या बैठकीनुसार लोकसभेत गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

रामदास कदम यांनी शिंदे गटाच्या कार्यकारणीमध्ये स्थान मिळण्याआधी शिवसेनाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक पत्रक काढत कदम यांची नेते पदावरून हकालपट्टी केल्याचे पत्र केली आहे. कदम पाठोपाठ माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची देखील हकालपट्टी केली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकरणीत कदम यांना नेतेपदी वर्णी लागली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधारे आणि दानवेंनी घेतली राऊतांची भेट; तर अफजल खानच्या कबरीसंदर्भात बोलताना, म्हणाले…

Darrell Miranda

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ कृतीचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Aprna

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk