Site icon HW News Marathi

लोकसभेत शिवसेनेच्या 18 खासदारांना भावना गवळींनी दिलेली व्हिप लागू होणार! – एकनाथ शिंदे

नवी दिल्ली | शिवसेनेच्या 18 खासदारांना भावना गवळी यांची व्हिप लागू होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शिवसेनेचा लोकसभेत फक्त गटनेता बद्दलला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या गटनेते पदी राहुल शेवाळे यांची वर्णी लावली आहे, असेही मुख्यमंत्री आज (19 जुलै) पत्रकार परिषदेत म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबद्दलची भूमिका आम्ही घेतली आहे. या भूमिकेला 12 खासदारांनी समर्थन केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवसेनेचे लोकसेभेतील गटनेते म्हणून राहुल शेवाळे आणि आमचे मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या नावांचा उल्लेख केला. 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची आज भेट घेतली. लोकसभेत वेगळ्या गटाची मागणी करत गटनेता बदलण्यासाठी त्यांना पत्र दिले आहे.  शिंदेंनी 12 खासदारसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

एनडीएमधून बाहेर पडलो नाही

“आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो नाही, आणि आम्ही तसे पत्र देखील दिले नाही. आम्ही आजही एनडीएचा घटक आहोत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु, शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेल्याचे पत्र देखील दिले नाही. परंतु, आम्ही यूपीएमध्ये आहोत, असे एकही पत्र दिलेले नाही,” असे शेवाळेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित बातम्या

शिवसेनेचा स्वतंत्र गट करण्यासाठी 12 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; एकनाथ शिंदेंची माहिती

 

 

Exit mobile version